भारतासह जगभरात ‘रोड-ट्रिप’ करायचीय ? ही बातमी नक्की वाचा

21 May 2018 - Loksatta

सेल्फ-ड्राइव्ह हॉलिडेजचा नवा ट्रेंड निर्माण करण्यासाठी भारताचा एक्सक्लुझिव्ह ब्रॅंड ‘सेल्फ-ड्राइव 365' सज्ज झाला आहे. सेल्फ-ड्राइव्ह 365 ब्रँडला कॉक्स अँड किंग्सने पाठबळ दिले आहे. ‘सेल्फ-ड्राइव 365' कडून भारतात व जगभरात निरनिराळ्या रोड-ट्रिपना तसंच प्रवाशांना नवनवे शोध घेण्यास प्रोत्साहन दिलं जाईल. रोड ट्रिप प्लानर म्हणून सर्व प्रकारच्या सेवा त्यांच्याकडून पुरवल्या जातील. काही विशेष ठिकाणे, अनुभव, सुविधा, कार व बाईकची सोय ही वैशिष्ट्ये असलेला सेल्फ-ड्राइव्ह ब्रँड ट्रिपमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी २४ तास त्यांचा सपोर्ट क्रू उपलब्ध ठेवणार आहे. ड्रायव्हिंगचा अनुभव कमी असलेल्या किंवा अजिबात नसलेल्या नवख्यांनाही हे उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. स्वतः वाहन चालवत असताना जग पाहण्याची इच्छा असलेल्यांना सेल्फ-ड्राइव्ह 365मुळे हमरस्ता सोडण्याचे आणि कधीही न चोखाळलेल्या मार्गाने जाण्याचे, मोजक्याच लोकांना माहीत असलेली ठिकाणे शोधून काढणे, तसेच मनुष्य, मशीन व रस्ता यांच्यातील नात्याचा वेध घेणे याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

‘द यूएसए – द ग्रेट पॅसिफिक ड्राइव्ह', ‘स्पेन – स्पॅनिश टँगो', आयर्लंड – द वर्ल्ड अटलांटिक ड्राइव्ह' हे काही आंतरराष्ट्रीय ड्राइव्ह आहेत, तर भारतात फिरण्यासाठी ‘हार्ट ऑफ द हिमालयाज', ‘इंटू दे टायगर्स लेअर' आणि ‘ईस्ट कोस्ट लाइफ' हे विशेष पर्याय आहेत.

प्रवासाची आवड असलेल्या ग्राहकांना साहस, लिजर, वाइल्डलाइफ, अन्नपदार्थ संस्कृती व इतिहास अशा निरनिराळ्या पर्यायांतून त्यांच्या पसंतीच्या अनुभवाची निवड करता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीची कार निवडण्यासाठी साध्या कारपासून लक्झरी एसयूव्हीपर्यंत किंवा भारत, अमेरिका, स्पेन, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांतील विविध प्रकारच्या मोटरबाइक असे असंख्य पर्याय उपलब्ध असतील.